टोनी प्रिमियर लीगमध्ये फेअरमाऊंट फॅलकनचा विजय

Bandra west, Mumbai  -  

वांद्रे - टोनी प्रिमियर क्रिकेट लीगच्या तिसऱ्या हंगामातला अंतिम सामना शुक्रवारी खेळला गेला. यामध्ये फेअरमाऊंट फॅलकन आणि आय लव्ह मुंंबई स्पोर्ट यांच्यात अंतिम लढत झाली. फेअरमाऊंट फॅलकन हा संघ विजेता ठरला.या लीगमध्ये साहिब रेंजर्स, रामा टायगर, टोनी गोरील्ला, हिरा सुपरस्टार, फेअरमाऊंट फॅलकन, सन्मित वॉरिअर्स, आय लव्ह मुंबई, उत्सव नाइट रायडर्स, दबंग बॉइज, अगिचा स्टेलिअन्स, रिकी टायगर, मुंबई हिरोस, सर्कस, प्लेबॉय, सच इंडियन या 14 संघांनी सहभाग घेतला होता. क्रिकेटचा चाहता नसलेला अभिनेता इमरान खान हा देखील या अंतिम सामन्यात उपस्थित होता आणि त्याने या क्रिकेटचा आनंदही लुटला. त्याच्यासह बॉलिवूडचा नवोदित सुपरस्टार सुरज पांचोली खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिला.

टोनी प्रिमियर लीगचा अंतिम सामना वांद्र्यातल्या सेंट अँड्यू या ग्राऊंडमध्ये रंगला.

Loading Comments