लहानग्यांच्या क्रीडा स्पर्धा


  • लहानग्यांच्या क्रीडा स्पर्धा
  • लहानग्यांच्या क्रीडा स्पर्धा
  • लहानग्यांच्या क्रीडा स्पर्धा
SHARE

घाटकोपर - शिवाजी शिक्षण संस्था, पूर्व प्राथमिक विभाग सेमी इंग्रजी शाळेत 30 नोव्हेंबरपासून दोन दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. स्पर्धा सकाळी ८ वाजता सुरू झाल्या. पहिल्या दिवशी धावणं आणि बादलीत चेंडू टाकण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तर छोटा शिशू गटासाठी धावणं आणि बादलीत रिंग टाकणं या स्पर्धा होत्या. मोठा शिशू गटासाठी बेडूक उडी आणि बटाटा शर्यत स्पर्धा घेण्यात आल्या. नर्सरीमध्ये बेडूक उडीत पल्लवी आणि रोशन, बटाटा शर्यतीत अवनी आणि यश ठोके मुलं-मुलींमध्ये प्रथम आले. छोटा शिशू गटात धावण्याच्या स्पर्धेत सिद्धी आणि नील, बादलीत रिंग टाकण्यात तेजस, आर्या प्रथम आले. तर मोठा शिशुमध्ये बटाटा शर्यत सानिका पेडणेकर आणि निखिल यादव, बेडूक उडी अनुष्का मुडेकर आणि साईनाथ पाटील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या