इमोजीत अवतरले रहाणे, कोहली

 Mumbai
इमोजीत अवतरले रहाणे, कोहली

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल)ची सुरुवात बुधवारपासून झाली. यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमींचे लक्ष आयपीएलकडे वेधले गेले. तर प्रत्येक जण आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी उस्तुक होते. क्रिकेट विश्वात आयपीएलला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आली आहे. सोशल मीडियावर देखील सध्या आयपीएलची चर्चा चांगलीच सुरू आहे. त्यातच आता ट्विटरने आयपीएलमधील सुपस्टार आणि लोकप्रिय खेळाडूंचे इमोजी वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे इमोजी खेळाडूंचे हॅशटॅग तयार करून वापरता येणार आहेत. यामध्ये शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, अजिंक्य रहाणे, ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, महेंद्रसिंह धोनी, स्टीव स्मिथ यांचा देखील समावेश आहे.
Loading Comments