लिबरल क्रिकेट शील्ड टुर्नामेंटमध्ये वेंगसरकर फाऊंडेशन विजयी

  Churchgate
  लिबरल क्रिकेट शील्ड टुर्नामेंटमध्ये वेंगसरकर फाऊंडेशन विजयी
  मुंबई  -  

  चर्चगेट - वानखेडे स्टेडीयममध्ये झालेल्या दुसऱ्या लिब्ररल क्रिकेट शील्ड 20 -20 टुर्नामेंटमध्ये वेंगसरकर फाऊंडेशन विरुद्ध संगम फाऊंडेशनच्या सामन्यात वेंगसरकर फाऊंडेशनने विजय मिळवला. विजेता संघाला लिब्ररल क्रिकेट टुर्नामेंटची ट्रॉफी देण्यात आली.

  वेंगसरकर फाऊंडेशनने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करताना संगम फाऊंडेशनला 14 षटकांतच 60 धावांवर रोखले. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने हे 60 धावांचे आव्हान 10 षटक आणि 8 गडी राखत सहज पार करत विजय संपादीत केला. या वेळी जयसाल वाडीयाल या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. या सामन्यात जयसाल वाडीयाल या गोलंदाजाने 4 षटकात फक्त 11 धावा देऊन 3 गडी बाद केले. सामन्यात दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या आक्रमी खेळीपुढे संगम फाऊंडेशनला पराभव पत्करावा लागला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.