विले पार्ले वॉरियर्सने मारली बाजी

 vile parle
विले पार्ले वॉरियर्सने मारली बाजी
विले पार्ले वॉरियर्सने मारली बाजी
विले पार्ले वॉरियर्सने मारली बाजी
See all

विले पार्ले - वामन दुभाषी मैदानात आम्ही पार्लेकर ग्रुपच्या वतीने सोमवारी एकदिवसीय क्रिकेट कपचे आयोजन करण्यात आले होते.  ७क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विलेपार्ले वॉरियर्स हा संघ अंतिम विजयी ठरला. ६ ओवरच्या या सामन्यात विलेपार्ले वॉरियर्सने पार्लेकर बुल्स या संघाचा ८२/२ धावांनी पराभव केला. तर पार्लेकर बुल्स या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या वेळी वीरमाता अनुराधाताई गोरे आणि हिंदी मालिकांत काम करणारे अभिनेते अब्दुलभाई ऊर्फ चार्ली यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Loading Comments