विराटचं शानदार द्विशतक


SHARE

मुंबई - मुंबईत चालू असलेल्या भारत विरुद्ध इग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं शानदार कामगिरी बजावून द्विशतक खेळी केली आहे. या वर्षातील तिसरी डबल सेंच्युरी करून त्यानं आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवलाय. कालपासून विराटच्या या कामगिरीमुळे क्रिकेट प्रेमींचा उत्साह वाढलाय. तर क्रिडा समीक्षकांनी विराटचं तोंडभरून कौतुक केलंय. सध्या मैदानावर विराट आणि जयंत यादव खेळत आहेत. टीम इंडियाने 7 बाद 579 धावा केल्या आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या