विराटभाऊ! नक्की चुकतंय कुठे?

 Mumbai
विराटभाऊ! नक्की चुकतंय कुठे?
Mumbai  -  

मुंबई - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. कोहली तिस-या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराटने दोन्ही डावांमध्ये मिळून केवळ 40 धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर असलेल्या विराटच्या खात्यावर 847 गुण आहेत. तर यामध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या खात्यावर 936 गुण तर दुसऱ्या स्थानावर असलेला न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या खात्यावर 869 गुण आहेत. केननं या वेळी चौथ्या स्थानवरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

तर दुसरीकडे आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आपलं स्थान कायम राखलं आहे. रवीचंद्रन अश्विन आणि जडेजा हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Loading Comments