..तेवढ्या पैशांचं तर माझा मुलगा चॉकलेट खातो - सेहवाग

Mumbai
..तेवढ्या पैशांचं तर माझा मुलगा चॉकलेट खातो - सेहवाग
..तेवढ्या पैशांचं तर माझा मुलगा चॉकलेट खातो - सेहवाग
..तेवढ्या पैशांचं तर माझा मुलगा चॉकलेट खातो - सेहवाग
See all
मुंबई  -  

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या टोलेबाजीमुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आणखी एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.  

सेहवाग म्हणतो, 'क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंना आज सरकारतर्फे दिवसाला फक्त 600 रुपये भत्ता म्हणून दिला जात आहे. हे कळल्यानंतर खूप आश्चर्य वाटले. दिवसाला 600 रुपयांचे चॉकलेट तर माझा मुलगा खातो.'
ज्या खेळाडूंकडून आपण ऑलम्पिकमध्ये पदक मिळवण्याची अपेक्षा करत आहोत, त्यांना फक्त 600 रुपये दिले जातात, ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यांना दिवसाला 2 ते 3 हजार रुपयांचा भत्ता दिला पाहिजे. तसेच अद्यावत सोयी-सुविधा देखील पुरवल्या पाहिजे

वीरेंद्र सेहवाग, माजी भारतीय क्रिकेटपटू


एका प्रसिद्ध वाहिनीवर सेहवागचा 'उम्मीद इंडिया' नावाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मंगळवारी त्याच्या घोषणेवेळी सेहवागने ही खंत व्यक्त केली. भारतीय क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाडूंच्या जीवनावर आणि त्यांच्या सुरू असलेल्या तयारीवर या कार्यक्रमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे.


यावेळी सेहवागने मोठा संघर्ष करून ऑलिम्पिकमध्ये मजल मारणाऱ्या रोव्हर दत्तू भोकनळचे भरभरुन कौतुक केले. ज्याला साधे पोहताही येत नव्हते, त्याने गेल्यावर्षी रिओ ऑलम्पिकमध्ये 13 वे स्थान पटकावून अभिमानास्पद कामगिरी केल्याचे सेहवाग म्हणाला.प्रशिक्षक नियुक्तीबद्दल बोलण्यास सेहवागची टाळाटाळ

नुकत्याच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये सेहवागने देखील होता. पण सेहवागला मागे टाकत शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत सेहवगला विचारले असता 'तुम्ही 'उम्मीद इंडिया' कार्यक्रमबद्दल प्रश्न विचारले, तर मी उत्तर नक्की देईन' असे बोलत त्याने उत्तर देण्यास टाळले.


गुरमिंदर कौरबद्दलच्या ट्विटवर वाद

दरम्यान, 20 वर्षीय पंजाबी तरुणी गुरमिंदर कौरच्या ट्विटवर वीरेंद्र सेहवागने केलेल्या ट्विटवरुनही मोठा वाद निर्माण झाला होता. 'माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, युद्धाने मारले' असे ही तरूणी म्हणाली होती. त्यावर 'मी त्रिशतक केले नसून माझ्या बॅटने केले' असे ट्विट सेहवागने केले होते.ग्लोबल वॉर्मिंगविषयी सेहवागने केलेल्या ट्विटवरुनही वादाचा धुरळा उडाला होता...सेहवागने शोएब अख्तरवर केली होती टीका

याआधीही मार्च 2016मध्ये 'शोएब माझा चांगला मित्र आहे. त्याची भारतात व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. त्याला कॉमेंट्रीसाठी चांगले पैसे मिळतील. म्हणून तो भारताचे कौतुक करतो' असे सेहवागने ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावर शोएबने 'सेहवागसारख्या महान खेळाडूचे हे अपरिपक्व वक्तव्य' असे ट्विट केले होते. त्यानंतर मात्र सेहवागने ते ट्विट डिलीट केले.
हेही वाचा -

नोटबंदीवर सेहवागची फटकेबाजी

आता घरात हॉकी स्टीक ठेवू नकोस - विरू


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.