वेस्टर्न रेल्वेने मारली बाजी

 Andheri Sports Complex
वेस्टर्न रेल्वेने मारली बाजी
Andheri Sports Complex, Mumbai  -  

वेस्टर्न रेल्वे संघाने बलाढ्य अशा महाराष्ट्र पोलीस संघावर एका गोलने विजय मिळवला आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन मधील एलिट डिव्हिजन मधील महत्वपूर्ण साखळी सामना जिंकला. वेस्टर्न रेल्वे संघाच्या मध्य क्षेत्ररक्षक असलेल्या सोमनाथ मोंडलने शानदार गोल करत महाराष्ट्र राज्य पोलीस संघाला साखळी सामन्यात जबरदस्त दणका दिला.

मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे हे सामने अंधेरीतील स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथे आयोजित करण्यात आले होते. या एलिट डिव्हिजन साखळी सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची अशी लढत झाली. सुरुवातील पहिल्या डावात दोन्ही संघ आक्रमकपणे एकमेकांना भिडले. तसेच दोन्ही संघांच्या बचाव फळींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विश्रांतीला दोन्ही संघांची गोल संख्या बरोबरीत राहिली. दुसऱ्या डावात वेस्टर्न रेल्वेच्या सोमनाथ मोंडलने चेंडूवर नियंत्रण मिळताच 78 व्या मिनिटाला गोल केला. वेस्टर्न रेल्वे संघाच्या विजयात तो गोल महत्वाचा ठरला. 

Loading Comments