विराट कॅप्टन तर युवीचे कमबॅक

 Pali Hill
विराट कॅप्टन तर युवीचे कमबॅक

मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. महेंद्रसिंह धोणीनंतर कर्णधारपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अपेक्षेनुसार विराटकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. त्यावेळी विराटच्या कर्णधारपदाच्या निवडीची घोषणा करण्यात आली. या तीन सामन्यांसाठी निवडलेल्या संघात महेंद्र सिंग धोणीलाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे धोणी प्रथमच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तसेच युवराज सिंगचेही संघात पुनरागमन झाले आहे.

भारतीय संघ (एकदिवसीय) - विराट कोहली (कर्णधार), महेंद्र सिंग धोणी, युवराज सिंग, लोकेश राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन, उमेश यादव.

भारतीय संघ (ट्वेंटी-20) - विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी,युवराज सिंग, मनदीप सिंग, लोकेश राहुल, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दीक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, उमेश यादव.

Loading Comments