निवडणूक आयोगाचे ट्रू व्होटर

  Pali Hill
  निवडणूक आयोगाचे ट्रू व्होटर
  मुंबई  -  

  मुंबई - महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 'ट्रू व्होटर' नावाचे अॅप सुरू केले आहे. या अॅपचा फायदा मतदार, निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी, तसेच निवडणुकीत भाग घेणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतात अशा प्रकारचे अॅप पहिल्यांदाच बनवण्यात आले आहे.

  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. आपले नाव मतदान यादीत आहे का? ते बरोबर आहे का? इत्यादी अनेक प्रश्न नागरिकांना पडत असतात. पण हे प्रश्न TRUE VOTER या अॅपवर सोडवता येणार आहेत. सध्या अॅन्ड्रॉइड मोबाईलवर चालणारे मोबाइल अॅप निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक घटकासाठी आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.