Advertisement

'डान्स दिवाने ३'मधील 'या' परीक्षकाला कोरोनाची लागण

डान्स दिवाने ३ या कार्यक्रमात माधुरी दिक्षीत (Madhuri Dixit), तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे असे तीन परिक्षक आहेत.

'डान्स दिवाने ३'मधील 'या' परीक्षकाला कोरोनाची लागण
SHARES

डान्स दिवानं ३ या शोचा परिक्षक धर्मेश येलांडेला (Dharmesh Yelande Testes COVID-19 Positive) देखील कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी असं समोर आलं होतं की, डान्स दिवाने ३ (Dance Deewane ३) च्या सेटवरील १८ क्रू मेंबर कोरोना पॉझिटिव्ह (18 Crew Member Tested Corona Positive) आले होते.

डान्स दिवाने ३ या कार्यक्रमात माधुरी दिक्षीत (Madhuri Dixit), तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे असे तीन परिक्षक आहेत. तर राघव जुयाल (Raghav Juyal) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. धर्मेश पॉझिटिव्ह आल्यानं त्याच्या चाहत्यांसह सर्वांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माधुरी आणि तुषार यांची कोरोना टेस्ट नेगिटिव्ह आली आहे. काही मीडिया अहवालांच्या मते, या कार्यक्रमाच्या मेकर्सनी धर्मेशला कोरोना लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस धर्मेश या कार्यक्रमाचा हिस्सा नसेल.

कारण काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये धर्मेश दिसत नाही आहे. त्याच्याऐवजी या प्रोमोमध्ये कोरिओग्राफर पुनीत पाठक (Puneet Pathak) आणि शक्ति मोहन (Shakti Mohan) दिसत आहेत.

ETTimes च्या अहवालानुसार ज्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रू मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यावेळी कार्यक्रमाचे निर्माते अरविंद राव यांनी त्वरित नवीन क्रू मेंबर्सची व्यवस्था केली होती.हेही वाचा

कार्तिक आर्यनने इटलीतून खरेदी केली महागडी कार, तब्बल 'इतकी' आहे किंमत

गलती से मिस्टेक हुवा! चूक कळल्यावर रणधीर कपूर यांनी डिलिट केला फोटो

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा