Advertisement

अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण

अभिनेता गोविंदालासुद्धा कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. सोमवारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांनी कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं.

अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण
SHARES

अभिनेत्री कतरिना कैफ हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कतरिनाने तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने स्वतःला आयसोलेट केले आहे.

कतरिनाने लिहिले, 'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाइन असून सर्व प्रोटोकॉलचं पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. याआधी रविवारी अभिनेता अक्षय कुमारचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सोमवारी त्याला पवईतील हीरानंदानी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर अभिनेता गोविंदालासुद्धा कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. सोमवारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांनी कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं.

याआधी रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.



हेही वाचा -

'हे' १३ सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा