Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

गलती से मिस्टेक हुवा! चूक कळल्यावर रणधीर कपूर यांनी डिलिट केला फोटो

सोमवारी म्हणजेच ५ एप्रिलला करीनाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.

गलती से मिस्टेक हुवा! चूक कळल्यावर रणधीर कपूर यांनी डिलिट केला फोटो
SHARES

बॉलिवूड स्टार करीना कपूर खान आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आईबाबा झाले. याचवर्षी २१ फेब्रुवारी रोजी करीनानं आपल्या दुस-या मुलाला जन्म दिला. सोमवारी म्हणजेच ५ एप्रिलला करीनाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.

रणधीर कपूर यांनी शेअर केलेला फोटो करीनाच्या दुसऱ्या मुलाचा असल्याचं म्हटलं जात आहे. पण काही वेळातच रणधीर यांनी फोटो डिलिट केला. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

रणधीर कपूर यांनी चुकून त्यांच्या नातवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या फोटोत करीना-सैफच्या मुलाचे दोन फोटो कोलाज केले पाहायला मिळाले. चूक लक्षात येताच त्यांनी तो फोटो डिलिट केला. तरीदेखील फोटो काही यूजर्सनी पाहिला आणि स्क्रिनशॉट घेऊन ठेवला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी सांगितलं होतं की, करीनाचा धाकटा मुलगा त्याचा भाऊ तैमूरसारखाच दिसतो. रणधीर कपूर यांना विचारण्यात आलं होतं की, नवजात बालक करीनासारखा दिसतो की सैफसारखा? यावर उत्तर देताना रणधीर म्हणाले होते की, 'मला तर सगळी मुलं सारखीच वाटतात. पण तिथे प्रत्येकजण म्हणत होतं की तो (करीनाचा लहान मुलगा) आपल्या मोठ्या भावासारखा तैमूरसारखा दिसत आहे.'हेही वाचा

रेश्मा सोनावणेचं धमाकेदार गाणं 'जवानी २०' आता सप्तसूर म्युझिकवर!

'सूर्यवंशी'चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा