Advertisement

‘या’ मालिकेतून ११ दिवसांत बाप्पाच्या ११ पौराणिक कथांचा होणार उलगडा

हे चॅनल गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे.

‘या’ मालिकेतून ११ दिवसांत बाप्पाच्या ११ पौराणिक कथांचा होणार उलगडा
SHARES

स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. हे चॅनल  गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे.

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अशा गोष्टी ज्या आपण कधीही ऐकल्या आणि पाहिल्या नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत ११ सशक्त आणि विशेष काहीतरी द्यायचा प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे स्टार प्रवाह आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भव्य रुपाचं दर्शन घरोघरी घडवून आणणार आहे.’

महाभारत, राधेकृष्ण यासारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ तिवारी यांच्या स्वस्तिक प्रोडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. उमरगाम इथं या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला आहे. लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे.



हेही वाचा

न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्य समोर येईल - रिया चक्रवर्ती

मराठीतील पहिला झोंबिवर आधारीत चित्रपट, झोंबिवलीचा फर्स्ट लूक आला समोर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा