Advertisement

लॉकडाऊनमध्ये पाहा 'ऑफिस ऑफिस'ची धम्माल

सोनी सबनं ‘ऑफिस ऑफिस’ ही मालिका पुन्हा आणली आहे.

लॉकडाऊनमध्ये पाहा 'ऑफिस ऑफिस'ची धम्माल
SHARES

लॉकडाऊन दरम्यान, प्रत्येकजण दूरदर्शन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाच्या शोधात आहे. त्यात जुन्या मालिका पुन्हा दाखवण्याचा एक नवाच ट्रेंड सुरू झाला आहे. रामायण ही मालिका सुरू केल्यानंतर इतर जुन्या मालिकांची देखील मागणी होऊ लागली. आता प्रत्येक चॅनल जुन्या मालिका घेऊन येत आहे. स्टार भारतवर साराभाई वर्सेस साराभाई आणि खिचडी ही मालिका पुन्हा सुरू झाली. आता सोनी सबनं ‘ऑफिस ऑफिस’ ही मालिका पुन्हा आणली आहे.

या कार्यक्रमात पंकज कपूर यांनी मुसद्दी लाल त्रिपाठी उर्फ सामान्य माणूस म्हणून भूमिका साकारली होती. त्यांच्या व्यतिरिक्त, कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये उशा मॅडम म्हणून आसावरी जोशी, शुक्ला म्हणून संजय मिश्रा, पटेल म्हणून देवेन भोजानी, भाटिया म्हणून मनोज पाहवा, पांडे जी म्हणून हेमंत पांडे आणि टीना म्हणून एवा ग्रोव्हर अशी नावे आहेत. ऑफिस कल्चरनं तुमचं मनोरंजन करण्यासाठी ते पुन्हातयार आहेत. १३ एप्रिल २०२० पासून ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

ऑफिस ऑफिस मुसद्दिलालभोवती फिरणारी कथा आहे. नोकरदारांनी भरलेल्या कार्यालयातून आपले कार्य पूर्ण करण्यासाठी नोकरशाहीच्या अडथळ्यांना तोंड द्यायची त्यांची धडपड यात पाहायला मिळते.

याबद्दल बोलताना मनोज पाहवा म्हणाले की, “जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली होती. शिवाय त्यावेळीही मालिकेनं चांगलं प्रदर्शनही केलं होतं. ती मालिका पुन्हा टिव्हीवर येणं, हे चांगलं आहे. पुन्हा एकदा मालिका सब चॅनलवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास येत आहे. ज्या लोकांना पूर्वी ही मालिका आवडली होती ते पुन्हा पाहू शकतात. ज्यांनी नाही पाहिली त्यांना देखील पाहण्याची संधी मिळाली आहे. ते खरोखर चांगले दिवस होते आणि या मालिकेचे शूटिंग करण्याचा एक सुंदर अनुभव होता. मी विशेषत: वरिष्ठ असलेले पंकज कपूर सर यांच्याकडून खूप काही शिकलो. संपूर्ण टीमचा इतका चांगला बॉन्ड होता की आम्ही सेटवर जाण्यासाठी उत्सुक असायचो.”

देवेन भोजानी यांनी पटेल यांच्या भूमिके संदर्भात लिहताना म्हटलं की, “माझे दोन शो, भखरवाडी आणि ऑफिस ऑफिस सोनी सब या चॅनलवर प्रसारित होणार आहेत. ऑफिस ऑफिस परत येत आहे हे ऐकून बरं वाटलं. आम्ही २००१-२००२ दरम्यान ही मालिका केली होती. आता जवळजवळ २ दशकांनंतर पुन्हा प्रसारित होत आहे. हा कार्यक्रम त्यावेळी होता तसाच अजूनही संबंधित आहे. लॉकडाउनच्या काळात, जेव्हा संपूर्ण जग तणाव, वेदना आणि उदासीनपणामधून जात आहे, ऑफिस ऑफिसचे पुन्हा प्रेक्षेपण त्याचं मन वळवेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. मी स्वत: अशा शोची वाट पाहत आहे.”

आशावरी जोशी उषा मॅडमच्या भूमिके संदर्भात लिहताना त्या म्हणाल्या की, “दोन दशकांनंतर आम्ही पुन्हा सोनी सबच्या दर्शकांकडे येत आहोत. आपण सगळेच एका कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. अशा परिस्थितीत ही मालिका नक्कीच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणेल.”

मुळात २००१ मध्ये प्रसारित झालेली ही मालिका कॉमेडीवर सादर केली गेली. ज्यातून अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या आहेत. उषा मॅडमची ‘वो तो’ आणि पटेल जी यांच्या ‘दो बातें’ यासारख्या ट्रेडमार्क 'तकिया कलाम' बरोबर प्रत्येक पात्रातील भूमिका उत्तम प्रकारे लिहिल्या गेल्या आहेत. 'ऑफिस ऑफिस' सोनी सबवर १३ एप्रिल २०२० पासून सुरू होत असून रोज संध्याकाळी ६ आणि १०.३० वाजता प्रसारित होईल.



हेही वाचा

शक्तीमान बंद होण्यामागे 'हे' आहे कारण, मुकेश खन्नांचा खुलासा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा