Advertisement

'इब्लिस' नाटकात पाहा शेवंताची अदाकारी

शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर 'इब्लिस' या नाटकात आपली अदाकारी दाखवताना दिसणार आहे.

'इब्लिस' नाटकात पाहा शेवंताची अदाकारी
SHARES

झी मराठीवर येणारी रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता तर सर्वांनाच माहित आहे. आपल्या अदांनी अण्णांसोबतच तिनं प्रेक्षकांना देखील घायाळ केलं. आता हीच शेवंता टेलिव्हिजनवरून थेट रंगभूमीवर तुमच्या भेटीला येणार आहे. शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर 'इब्लिस' या नाटकात आपली अदाकारी दाखवताना दिसणार आहे.

  
 
 
 
 View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 

 चरणी वाहिले लोकाश्रयी, शृंगार मदना सुमन पहिले श्रद्धेचे वाहिले, नाव 'शेवंता' प्रेमालयात होती तेंव्हा, प्रसन्न रंगदेवता! तीस नमन करून 'जुई' नामे दुसरे सुमन,  चरणी वाहत आहे जन्म-मरण, राग यमना. अनेक वर्षे अनेक पुष्पे, वाहिन त्याच श्रद्धे, करते आवाहन आधी सेवा ही कबुला. आस प्रेमाची, विश्वास माझा, तुमच्या श्रद्धेला. धुंद आसमंत जेंव्हा होईल त्या घटकेला, कराल पुन्हा अमाप गर्दी 'इब्लिस' या नाट-काला… *लेखक- दिगदर्शक:  मिलिंद शिंत्रे  नेपथ्य:  संदेश बेंद्रे संगीत: राहुल रानडे प्रकाश योजना: शितल तळपदे वेशभूषा : महेश शेरला* *कलाकार / पात्र परिचय:  राहुल मेहंदळे, सुनील देव,  अपूर्वा नेमळेकर उर्फ 'जुई', आणि वैभव मांगले* *शुभारंभाचा प्रयोग*  दिनांक २१ डिसेंम्बर २०१९ वेळ रात्री ८.३०  वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आणि लवकरच तुमच्या जवळच्या नाट्यगृहात  शब्दांकन  मंगेश साळवी . #apurvanemlekar #newbeginnings #newnatak #Iblis #Iblisthenatak #jui #zeemarathi Thank you @zeemarathiofficial 🙏

 

A post shared by  Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on


'इब्लिस' या नाटकाचा पोस्टर अपूर्वानं नुकताच इन्स्टावर शेअर केला आहे. या नाटकात तिचं 'जुई' असं नाव असणार आहे. 'शैतान हाजिर' अशी या नाटकाची टॅगलाईन आहे. अपूर्वा सोबत अभिनेते वैभव मांगले हे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसंच राहुल मेहेंदळे आणि सुनील देव हे कलाकार देखील महत्त्वाच्या भुमीका साकारणार आहेत.

२१ डिसेंबर २०१९ ला हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्री ८.३० वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हे नाटक पाहता येईल. बाकी नाट्यगृहात लवकरच हे नाटक पाहता येईल



हेही वाचा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा