गिरगावकरांनी अनुभवली लोकसंगीताची रंगत!

 Girgaon
गिरगावकरांनी अनुभवली लोकसंगीताची रंगत!

गण, गौळण, बतावणी आणि वग या क्रमाने वगनाट्याचे होणारे सादरीकरण, भारुड आणि गोंधळातून दिले जाणारे सामाजिक धडे, वाघ्या-मुरळीचा तडफदार ठेका गिरगावकरांनी बुधवारी रात्री अनुभवला. निमित्त होते, 'लोकरंग महोत्सवा'चे!

पाश्चात्य संगीताच्या वावटळीत लोकसंगीत गडप होत चालले आहे. नव्या पिढीलाही लोकसंगीताचे महत्त्व कळावे, त्यातील भावार्थ उमगावा, या उद्देशाने 'महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान, न्यास'तर्फे 'लोकरंग महोत्सवा'चे शहरात विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.


सांस्कृतिक परंपरेचे दर्शन

या महोत्सवातील पहिला कार्यक्रम गिरगावमधील साहित्य संघ मंदिरात झाला. यावेळी महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा, लोककला, ग्रामीण जीवनाचे दर्शन गिरगावकरांना घेता आले.अस्सल गीतांचा नजराणा

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वदनाने झाली. त्यानंतर खंडेरायाच्या लग्नाला, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वाजले की बारा अशा मराठी मातीतल्या एकाहून एक अस्सल गीतांचा नजराणा पेश करत लोककलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.पूर्णपणे मोफत

संतोष परब यांच्या लेखणीतून 'माझा महाराष्ट्र' ही संकल्पना साकारली आहे.  निवेदन, वादन, नृत्य असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. केवळ लोकसंस्कृतीचे दर्शन व्हावे, या उद्देशाने सुरु केलेला हा कार्यक्रम मुंबईकरांसाठी पूर्णपणे मोफत आहे.यापुढील कार्यक्रम

30 जून सायंकाळी 7 वाजता साहित्य संघ मंदीर, गिरगाव येथे रसिकप्रेक्षकांना मराठमोळ्या संस्कृतीची संगीतमय अनुभूती घेता येईल. 'मुंबई लाइव्ह' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.हे देखील वाचा -

लोकसंगीताची मजा अनुभवायचीय?, 'लोकरंग महोत्सवा'ला या!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments