Advertisement

संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर


संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर
SHARES

मुंबई - 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची एकमतानं निवड करण्यात आलीय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ बैठकीत हा निर्णय झाला. सहा दशकांहून अधिक काळाच्या अभिनय प्रवासात सावरकर यांनी विविधांगी व्यक्तिरेखांना न्याय दिलाय. सहज अभिनय, सुस्पष्ट शब्दोच्चार ही त्यांच्या अभिनयाची बलस्थानं म्हणायला हवीत. नुकतीच वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करणाऱ्या सावरकर यांना नाट्य परिषदेच्या वतीनं ही अनोखी भेट मिळाली आहे. संमेलनाध्यक्षपदी निवडीचं वृत्त कळल्यानंतर जयंत सावरकर यांनी नाट्यरसिकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त केला. सुविधांच्या अभावामुळे दर्जेदार नाट्यकृती रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकत नाहीत. अशा नाट्यकृतींसाठी नवनवीन नाट्यगृहांची दारं खुली करण्याचा प्रयत्न अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मुंबई लाइव्हकडे व्यक्त केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा