Coronavirus cases in Maharashtra: 691Mumbai: 377Pune: 82Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Pimpri Chinchwad: 20Nagpur: 17Ahmednagar: 17Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Aurangabad: 5Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

यापुढं नाटकात काम करणार नाही, असं का म्हणतोय सुबोध भावे?

पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे वास्तवात शांत स्वभावाचा असला, तरी सध्या तो भलताच संतापलेला आहे. यापुढं नाटकात काम न करण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे.

यापुढं नाटकात काम करणार नाही, असं का म्हणतोय सुबोध भावे?
SHARE

पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे (subodh bhave)वास्तवात शांत स्वभावाचा असला, तरी सध्या तो भलताच संतापलेला आहे.  यापुढं नाटकात काम न करण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. 

कारण काय?

सुबोधनं सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टद्वारे त्यानं आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे. “अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाइल (Mobile) वाजत असतील, तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच यापुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोनच्यामध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा”… असं ट्विट (Tweet)करत नाटकाचा प्रयोग सुरू असताना मोबाइलला महत्त्व देणाऱ्या प्रेक्षकांच्या मुखात सुबोधनं जणू चपराकच मारली आहे.

नाट्यरसिकांच्या प्रतिक्रिया

सुबोधनं टाकलेल्या या पोस्टवरून सोशल मीडियावर जणू मतमतांतरांचं वादळच उठलं आहे. कलाकार-तंत्रज्ञांसोबत खरे नाट्यरसिक मात्र सुबोधच्या पाठिशी उभे राहिले आहेत, पण काहींनी सुबोधच्या या ट्विटचा उलटा अर्थ काढत ‘तुमच्या मालिका चांगल्या नसल्या तरी आम्ही पाहतोच ना’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर प्रत्येक नाटकाचा प्रयोग सुरू करण्यापूवींच मोबाइल बंद करा किंवा सायलेंट मोडवर ठेवण्याचं आवाहन केलं जातं, पण काही रसिक त्याकडं दुर्लक्ष करतात आणि त्यांचा मोबाइल नाटक रंगात आलेलं असताना ऐन मोक्याच्या क्षणी वाजू लागतो. त्यामुळं प्रयोग सादर करणाऱ्या रंगकर्मींच्या कामात व्यत्यय येतो.

तर, डोअरकिपर होईन

सुबोध सध्या ‘अश्रूंची झाली फुले’ या गाजलेल्या नाटकाचे प्रयोग सादर करीत आहे. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकाचा मोबाइल वाजल्यानं व्यत्यय आल्यानंतर सुबोधनं संतप्त होऊन फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाटक पूर्णत: एकरूप होऊन पाहण्याची गरज जर रसिकांना वाटत नसेल, तर यापुढं नाटकात काम न करणं हाच उपाय असल्याचं सुबोधचं म्हणणं आहे. खऱ्या प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये यासाठी थोडी मवाळ भूमिका घेत सुबोधनं म्हटलं आहे की, ”नाटक हे फक्त नटांचं नसतं. नाटकातून मिळणारा आनंद हा रसिकांचा हक्क असतो. तो आनंद घेताना तुम्हाला मोबाइल फोन काही तासांकरीता बंद किंवा साइलेंटवर ठेवता आलं पाहिजे.” त्यामुळं आजपासून नाटक सुरू होण्यापूर्वी डोअरकीपर म्हणून रसिकांचे मोबाइल फोन बंद किंवा साइलेंट आहेत का? हे तपासून मगच नाटकाला सुरुवात करणार असल्याचं सुबोधनं म्हटलं आहे.हेही वाचा-

‘एक टप्पा आऊट’मध्ये अवतरणार विनोदाचा बादशहा

'ये रे ये रे पैसा २'चा धमाकेदार ट्रेलर लाँचसंबंधित विषय
संबंधित बातम्या