Advertisement

'ये रे ये रे पैसा २'चा धमाकेदार ट्रेलर लाँच

लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचं तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, दर्जेदार निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि लक्षवेधी संवाद. हे सगळं वर्णन आहे 'ये रे ये रे पैसा २' या मराठी चित्रपटाचं...

'ये रे ये रे पैसा २'चा धमाकेदार ट्रेलर लाँच
SHARES

लंडनमध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचं तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, दर्जेदार निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि लक्षवेधी संवाद. हे सगळं वर्णन आहे 'ये रे ये रे पैसा २' या मराठी चित्रपटाचं...


रंगतदार कथानक

अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट 'ये रे ये रे पैसा २'मध्ये पहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं. मात्र चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद. टाळ्या, शिट्ट्या वाजवत हसायला लावणारे संवाद आणि प्रसंग ट्रेलरमध्ये आहेत. या जोडीला भव्यता आणि चकचकीतपणाही या चित्रपटात आहे. त्यामुळंच 'ये रे ये रे पैसा २'चा ट्रेलर चित्रपटाविषयीचं कुतूहल वाढवणारा वाटतो. 


९ ऑगस्टला प्रदर्शित 

या चित्रपटात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, फैजल इमरान यांनी संकलन, ट्रॉय आरिफ यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत, सुनील नवले यांनी रंगभूषा, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा, राहुल-संजीव यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गायक  अवधूत गुप्ते,  मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी  गायली आहेत.  अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हृषिकेश कोळी यांनी पटकथा संवाद लेखन केलं आहे. ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Trailer Link - https://youtu.be/Uc32sfA0D1cहेही वाचा -

'सुवर्ण' काळाच्या 'सुवर्ण' आठवणी!

मराठीची वारी लंडनच्या दारी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा