Coronavirus cases in Maharashtra: 1367Mumbai: 857Pune: 169Navi Mumbai: 31Kalyan-Dombivali: 30Thane: 28Islampur Sangli: 26Ahmednagar: 25Pimpri Chinchwad: 19Nagpur: 19Aurangabad: 16Vasai-Virar: 11Buldhana: 8Latur: 8Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 6Usmanabad: 4Mira Road-Bhaynder: 4Yavatmal: 3Ratnagiri: 3Palghar: 3Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Akola: 1Total Deaths: 72Total Discharged: 120BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

‘एक टप्पा आऊट’मध्ये अवतरणार विनोदाचा बादशहा

‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर या आठवड्यात खास हजेरी लावणार आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशहा अशोक सराफ. अशोक सराफ यांच्या उपस्थितीनं सेटवरचं वातावरणच बदलून गेलेलं प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

‘एक टप्पा आऊट’मध्ये अवतरणार विनोदाचा बादशहा
SHARE

‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर या आठवड्यात खास हजेरी लावणार आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशहा अशोक सराफ. अशोक सराफ यांच्या उपस्थितीनं सेटवरचं वातावरणच बदलून गेलेलं प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


स्पर्धकांना खास टिप्स 

 विनोदाच्या बादशहाची प्रत्यक्ष भेट होणं हा क्षण ‘एक टप्पा आऊट’च्या सर्व स्पर्धकांसाठी सुखावणारा ठरणार आहे. अशोक सराफ यांना मराठी चित्रटसृष्टी प्रेमानं अशोकमामा म्हणते. याच अशोक मामांच्या स्वागतासाठी स्पर्धकांनी जय्यत तयारी केली आहे. अशोक मामांच्या सुपरहिट सिनेमातले काही प्रसंग अनोख्या ढंगात सादर करत स्पर्धकांनी‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर धमाल उडवून देणार आहेत. स्पर्धकांचं थक्क करणारं टॅलेण्ट पाहून अशोक सराफही खुश होणार असून, ते स्पर्धकांना खास टिप्स देत प्रोत्साहन देणार आहेत. या खास पाहुण्यांच्या जोडीला भरत जाधव, निर्मिती सावंत आणि जाॅनी लिव्हर हे परीक्षकही स्पर्धकांना दाद देताना दिसणार आहेत.


एलिमिनेशनची टांगती तलवार 

‘एक टप्पा आऊट’ची ही स्पर्धा दिवसेंदिवस चुरशीची होत आहे. उत्तम सादरीकरणासोबतच एलिमिनेशनची टांगती तलवार असल्यामुळं स्पर्धकांपुढं नवं आव्हान आहे. यासाठी स्पर्धक जीवतोड मेहनत करत आहेत. महाराष्ट्राला अनेक दिग्गज विनोदवीरांचा वारसा लाभला आहे. पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे यासारख्या दिग्गजांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला हसवलं आहे. हीच परंपरा अखंड जपण्याचा प्रयत्न ‘एक टप्पा आऊट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. या कार्यक्रमातून बऱ्याच वर्षांनंतर स्टॅण्ड अप कॉमेडीचा आनंद प्रेक्षकांना घेता येत आहे.


रेशमचा रापचिक राडेबाज

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे पार पडलेल्या ऑडिशन्समधून हे स्पर्धक निवडण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट एका मंचावर आल्यामुळं प्रेक्षकांसाठी ‘एक टप्पा आऊट’ म्हणजे अनोखी पर्वणी ठरत आहे. ‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर रेशमचा रापचिक राडेबाज, अभिजीतचा अवली आखाडा, विजयचे वात्रट वल्ली आणि आरतीचा अतरंगी अड्डा धमाल करायला सज्ज आहेत.हेही वाचा -

'सुवर्ण' काळाच्या 'सुवर्ण' आठवणी!

मराठीची वारी लंडनच्या दारी
संबंधित विषय
संबंधित बातम्या