मोफत पहा 'आमच्या 'ही'चं प्रकरण'!

दादर सांस्कृतिक मंचच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि मुंबई बीट्स या संस्थेच्या सहकार्यानं 'आमच्या 'ही'चं प्रकरण' या नाटकाचा विनामूल्य प्रयोग दाखवण्यात येणार आहे.

  • मोफत पहा 'आमच्या 'ही'चं प्रकरण'!
  • मोफत पहा 'आमच्या 'ही'चं प्रकरण'!
SHARE

नाटक जपणं आणि ते वाढवणं ही आजची काळाची गरज बनली आहे. सिनेमांसोबतच ओटीटीच्या आजच्या विश्वात नाटक कुठेतरी हरवू नये यासाठी बरेच नावीन्यपूर्ण पावलं उचलली जात आहेत. 'नाटक बघुया, नाटक जपूया' असं म्हणत 'आमच्या 'ही'चं प्रकरण' या नाटकाचा विनामूल्य प्रयोग सादर करणं हे त्याच वाटेवरील नवीन पाऊल आहे.


दादर सांस्कृतिक मंच

दादर सांस्कृतिक मंचच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि मुंबई बीट्स या संस्थेच्या सहकार्यानं 'आमच्या 'ही'चं प्रकरण' या नाटकाचा विनामूल्य प्रयोग दाखवण्यात येणार आहे. दादर मधील सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी दादरमधे विविध संकल्पना साकारण्यासाठी तसंच दादरप्रेमींना एकत्र आणण्यासाठी दादर सांस्कृतिक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. दादर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून महिला, पुरुष, तरुण व ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. यात सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा विषयक असे सर्व प्रकारचे कार्यक्रम समाविष्ट असतात. 'आमच्या 'ही'चं प्रकरण'  या नाटकाचा विनामूल्य प्रयोग दाखवणं हा त्याचाच एक भाग आहे.


विनामूल्य प्रवेशिका

१२ एप्रिल रोजी संध्याकाळी ६:३० वाजता, रविंद्र नाट्य मंदिर येथे 'आमच्या 'ही'चं प्रकरण'चा विनामूल्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाटकात निखिल रत्नपारखी, भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर, आनंद काळे, मयुरेश खोले, प्रियदर्शनी इंदलकर यांच्या भूमिका आहेत. एकदंत प्रकाशित आणि अष्टविनायक निर्मित या नाटकाचं लेखन सचिन मोटे यांनी केलं असून, दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांचं आहे. नाटकाच्या विनामूल्य प्रवेशिका प्रयोगापूर्वी दोन तास आधी नाट्यगृहाबाहेर उपलब्ध करण्यात येतील.


कलारंजन पुरस्कार

नाटक आणि रंगभूमी म्हणजे मराठी माणसाच्या मनाचे हळवे कोपरे असले तरी हल्ली म्हणावं तितके प्रेक्षक नाटकांना हजेरी लावत नाहीत. हेच चित्र बदलण्यासाठी खारीचा वाटा म्हणून दादर सांस्कृतिक मंचानं 'आमच्या 'हि'चं प्रकरण'चा प्रयोग विनामूल्य आयोजित केला आहे. या निमित्तानं यंदा ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना कलारंजन पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.हेही वाचा -

प्रदीप नांदराजोग रविवारी घेणार मुख्य न्यायाधीशपदाची शपथ

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा, निवडणूक आयोगाविरोधात केलं होतं वक्तव्यसंबंधित विषय
ताज्या बातम्या