Advertisement

प्रदीप नांदराजोग रविवारी घेणार मुख्य न्यायाधीशपदाची शपथ

मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंंद्राजोग हे रविवारी ७ एप्रिल रोजी मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.

प्रदीप नांदराजोग रविवारी घेणार मुख्य न्यायाधीशपदाची शपथ
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश प्रदीप नांदराजोग रविवारी ७ एप्रिल रोजी मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. रविवारी सकाळी १०.३० वाजता हे आपलव्या पदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव प्रदीप नांदराजोग यांना शपथ देणार आहेत. दरम्यान, शनिवारी नरेश हरिशचंद्र पाटिल या पदावरून निवृत्त होणार असून, त्याच्यानंतर प्रदीप नांदराजोग हे पद सांभाळणार आहेत


नवे मुख्य न्यायाधीश

राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नांदराजोग यांचं नाव सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदासाठी सुचवलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमच्या शिफारशीला मान्यता देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रदीप नांदराजोग यांची मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले


२२ वर्ष वकील

प्रदीप नांदराजोग हे मुळचे दिल्लीचे रहिवाशी आहेत. तसंच, त्यांची मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली असून ते २०२० पर्यंत कार्यरत असणार आहेत. तब्बल २२ वर्ष वकील म्हणून सेवा देणारे प्रदीप नांदराजोग १४ वर्ष दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायधीश होते. त्यानंतर प्रदीप यांची राजस्थान उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी निवड करण्यात आली होती



हेही वाचा -

५ वर्षांत गोपाळ शेट्टींच्या संपत्तीत ६५ टक्क्यांनी वाढ

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा, निवडणूक आयोगाविरोधात केलं होतं वक्तव्य



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा