Advertisement

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा, निवडणूक आयोगाविरोधात केलं होतं वक्तव्य

निवडणूक आयोगाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा, निवडणूक आयोगाविरोधात केलं होतं वक्तव्य
SHARES

निवडणूक आयोगाविरोधात आक्षेपार्ह विदाध केल्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच तुरुंगात टाकू’, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


निवडणूक आयोगावर टीका

लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून लढत असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची बुधवारी यवतमाळ इथं प्रचारसभा झाली. या सभेमध्ये आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. 'निवडणूक आयोग म्हणतो पुलवामा घटनेवर तुम्ही बोलायचं नाही. आम्ही बोलू, कारण संविधानानं आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे.’ निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असून, आम्ही सत्तेत आलो तर यांना तुरुंगात टाकू, अशी टीका त्यांनी या सभेमध्ये बोलताना केली. त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगानं दिला होता.

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध दहशत दाखविणं, धमकी देणं या गुन्ह्यासाठी फौजदारी दंडसंहितेच्या कलम ५०३, ५०६ नुसार आणि १८९ नुसार ही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणं जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवालही मागविला होता.


'सी व्हिजिल' अॅपवर तक्रारी दाखल

मुंबईत लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच उमेदवारांच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या सी व्हिजिल अॅपवर तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा व उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात मागील दोन-तीन दिवसांत सी व्हिजिल अॅपवर तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारींची तातडीने दखल घेत मिलिंद देवरा यांचे फलक तातडीने हटवण्यात आले.हेही वाचा -

राहुल गांधींना अमेठीनं स्वीकारलं नाही, देश कसा स्वीकारेल - शहानवाज हुसैन

जाहिरातबाजीत भाजपा अव्वल; काँग्रेस सहाव्या स्थानावरRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement