Advertisement

राहुल गांधींना अमेठीनं स्वीकारलं नाही, देश कसा स्वीकारेल - शहानवाज हुसैन

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीमधील जनतेनं आपली खासदार म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे हवेचा रोख ओळखून राहुल गांधी अमेठीतून पळ काढत वायनाडला गेले आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सैय्यद शहानवाज हुसैन यांनी गुरूवारी मुंबईत केली.

राहुल गांधींना अमेठीनं स्वीकारलं नाही, देश कसा स्वीकारेल - शहानवाज हुसैन
SHARES

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीमधील जनतेनं आपली खासदार म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे हवेचा रोख ओळखून राहुल गांधी अमेठीतून पळ काढत वायनाडला गेले आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सैय्यद शहानवाज हुसैन यांनी गुरूवारी मुंबईत केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते आणि भाजपा माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह आणि खा. किरीट सोमय्या उपस्थित होते.


काँग्रेस घाबरलेला पक्ष

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त घाबरलेला कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. गेल्या ४ दशकापासून जो अमेठी मतदारसंघ काँग्रेसच्या कुटुंबाचा एक भागच बनून राहिलेला आज त्याच मतदारसंघातून राहूल गांधीना पळ काढण्याची नामुष्की आल्याचं हुसैन म्हणाले. तसंच आता अमेठीतील जनता त्यांच्याकडे हिशोब मागत आहे. ज्यांना अमेठीतल्या नागरिकांनी स्वीकारलं नाही, त्यांना देश कसा स्वीकारणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ का निवडला हा संशोधनाचाच भाग आहे. जिथं अल्पसंख्यांकांच प्रमाण जास्त आहे अशा वायनाडमधून ते आता लढणार आहेत. राहुल गांधी अमेठीतून पळाल्यामुळे आता उत्तर प्रदेशमधील अन्य लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अन्य उमेदवारही निवडणूक लढावायची की नाही याचा सध्या विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


दबावाखाली निर्णय नाही

निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला कोणत्या मतदारसंघातून उभं करायचं याचा सर्वस्वी निर्णय हा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून घेण्यात येतो. कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली येऊन उमेदवार निवडीचे निर्णय घेतले जात नाहीत. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षाच्या साहय्याने एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास हुसैन यांनी व्यक्त केला.




हेही वाचा - 

जाहिरातबाजीत भाजपा अव्वल; काँग्रेस सहाव्या स्थानावर

'पीएम मोदी सिनेमा राहुल गांधींनाही आवडेल'- विवेक ओबेरॉय


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा