Advertisement

'पीएम मोदी सिनेमा राहुल गांधींनाही आवडेल'- विवेक ओबेरॉय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील आवडेल; कारण ते देशभक्त आहेत, असं या सिनेमात नरेंद्र मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ऑबेरॉय यांनी म्हटलं आहे.

'पीएम मोदी सिनेमा राहुल गांधींनाही आवडेल'- विवेक ओबेरॉय
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील आवडेल; कारण ते देशभक्त आहेत, असं या सिनेमात नरेंद्र मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ऑबेरॉय यांनी म्हटलं आहे. मी हा सिनेमा भक्तांसाठी नाही, तर देशभक्तांसाठी बनवला असल्याचं देखील विवेक ओबेरॉय यानं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. 


५ एप्रिलला प्रदर्शित

पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा ५ एप्रिलला रिलिज होणार आहे. मात्र हा सिनेमा रिलिज होण्याअगोदरच राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. काही राजकीय पक्षांनी हा सिनेमा निवडणूक संपल्यानंतर रिलिज करण्याची मागणी केली आहे. मात्र न्यायालय व निवडणूक आयोगाने या सिनेमाच्या रिलिज हिरवा कंदील दिला आहे.


मोदी बायोपिकचा नवा खेळ

पीएम नरेंद्र मोदी या सिनेमावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील निशाणा साधला आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन 'सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी मोदी बायोपिकचा नवा खेळ! आज CBFCचं प्रमाणपत्र मिळवणार आणि परवा देशभरात सिनेमा प्रदर्शित होणार! मग, मराठी निर्मात्यांना हे प्रमाणपत्र मिळवायला ५० दिवस का थांबावं लागतं?,' असा सवाल उपस्थित करत टीका केली आहे. 




हेही वाचा -

मुंबई सत्र न्यायालयाशेजारील धोकादायक इमारत १५ मेपर्यंत खाली करा - हायकोर्ट

भाजपाविरोधात राज ठाकरे राज्यभरात घेणार ८ ते ९ सभा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा