Advertisement

नवं कोरं एकवचनी नाटक 'मी माझे मला'

शीर्षक वाचल्यावर ‘एकवचनी नाटक’ हा प्रकार काय हा प्रश्न पडणं साहाजिक आहे. याबाबत या नाटकाचे दिग्दर्शक विजय गोखले यांनीच खुलासा करत सांगितलं की, आज माणूस केवळ स्वत:चा विचार करू लागला आहे. त्याचेच पडसाद या नाटकात उमटले असल्यानं ‘मी माझे मला’ हे एकवचनी शीर्षक या नाटकाला देण्यात आलं आहे.

नवं कोरं एकवचनी नाटक  'मी माझे मला'
SHARES

मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगवेगळे विषय सादर केले जातात. आजवर काळानुरूप किंवा कित्येकदा काळाच्या पुढं पाऊल टाकणाऱ्या नाटकांची निर्मितीही मराठी रंगभूमीनं झाली आहे. आजच्या परिस्थितीची जाणीव करून देणारं ‘मी माझे मला’ हे एकवचनी नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.


सामाजिक प्रश्न उपस्थित

शीर्षक वाचल्यावर ‘एकवचनी नाटक’ हा प्रकार काय हा प्रश्न पडणं साहाजिक आहे. याबाबत या नाटकाचे दिग्दर्शक विजय गोखले यांनीच खुलासा करत सांगितलं की, आज माणूस केवळ स्वत:चा विचार करू लागला आहे. त्याचेच पडसाद या नाटकात उमटले असल्यानं ‘मी माझे मला’ हे एकवचनी शीर्षक या नाटकाला देण्यात आलं आहे. आजच्या चौकोनी कुटुंबपद्धतीत आई-वडीलांना थारा नाही. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांनी उतारवयात जायचं तरी कुठं? पंख फुटलेल्या मुलांचं काहीच कर्तव्य नाही का? यांसारखे प्रश्न या नाटकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहेत. 


ज्वलंत विषय

सध्या या नाटकाची तालीम जोरात सुरू आहे. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात तालीम सुरू असताना पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी सर्व कलाकारांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना एक छोटासा प्रवेश करून दाखवत ‘मी माझे’मला'ची झलक दाखवली. या नाटकाचं लेखन आनंद म्हसवेकर यांनी केलं आहे. यानिमित्तानं एक ज्वलंत विषय रंगभूमीवर आणण्याची संधी मिळाल्याचं म्हसवेकर म्हणाले. अभिनयासोबतच या नाटकाची निर्मिती करणाऱ्या किशोर सावंत यांनी मुलं असूनही आश्रितासारखं जीवन जगणाऱ्या असंख्य आई-वडीलांच्या वेदना सहन होत नसल्यानं ‘मी माझे’मला’ची निर्मिती करत असल्याचं सांगितलं.


लवकरच रंगभूमीवर

मराठी चित्रपटांपासून मालिकांपर्यंत सर्वच ठिकाणी परिचयाचा असलेला सुरेखा कुडची हा लोकप्रिय चेहरा या नाटकात पाहायला मिळणार आहे. आजतागायत आपण बऱ्याचदा खलनायकी आणि ग्रे शेडेड भूमिका साकारल्या आहेत, पण ही व्यक्तिरेखा या सर्वांपेक्षा वेगळी आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी असल्याचं सुरेखा म्हणाली. सुरेखासोबत या नाटकात विघ्नेश जोशी, विजय गोखले, किशोर सावंत, विलास गुर्जर, रोहित मोहिते, हेमांगी राव या कलाकारांच्याही भूमिका आहेत. किवी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेलं हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.



हेही वाचा -

Movie Review : प्री-वेडींग शिनेमाची धमाल गोष्ट

छोटा भीमच्या चित्रपटाला दलेरच्या अँथम साँगचा तडका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा