Advertisement

ऋत्विकचं 'मोहे पिया' नाटक थिएटर ऑलम्पिक महोत्सवात!


ऋत्विकचं 'मोहे पिया' नाटक थिएटर ऑलम्पिक महोत्सवात!
SHARES

स्टार प्रवाहवरील 'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेत 'विहान'ची भूमिका साकारणारा ऋत्विक केंद्रे अवघ्या काही काळातच प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. हे नवीन वर्ष ऋत्विकसाठी जरा खासच आहे. 'मोहे पिया' या ऋत्विकच्या हिंदी नाटकाने मुंबईतल्या थिएटर ऑलिम्पिक महोत्सवाची सुरुवात होणार आहे.



येत्या २४ मार्चला थिएटर ऑलिम्पिक महोत्सव वरळीतील नेहरू सेंटर येथे रंगणार आहे.  या महोत्सवाचं यंदाचं आठवं वर्ष असून तो पहिल्यांदाच भारतात होणार आहे. 'मोहे पिया' या नाटकाचं दिग्दर्शन वामन केंद्रे यांनी केलं असून गौरी केंद्रे या निर्मात्या आहेत. लहानपानपासूनच त्याच्यावर अभिनयाचे संस्कार झाले असल्यामुळे ऋत्विक जाहिरात, नाटक, मालिका, सिनेमा या क्षेत्रांमध्ये अगदी बिनधास्त वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋत्विकला नाटकांचीही सिनेमा आणि मालिकांइतकीच आवड आहे. 

कॉलेजमध्ये असताना ऋत्विकने अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता. 'झुलवा' या प्रायोगिक नाटकापासून आपल्या रंगभूमीवरच्या करीअरची सुरुवात केली. त्याचबरोबर ऋत्विकने 'लु', 'मेरा बेटा चोर है', 'वो चार पन्ने' या हिंदी तर 'गोची शाकुंतल' या इंग्रजी तसेच गुजराती 'जयंतीलालनी सायकल' अशा विविध नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ऋत्विकच्या 'मोहे पिया', या हिंदी नाटकासह त्याच्या इंग्रजी नाटक 'ओ माय लव्ह' याबरोबरच मराठीतील 'प्रिया बावरी' या नाटकांचे ४१० पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत.



हेही वाचा

'गाव गाता गजाली' घेणार प्रेक्षकांचा निरोप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा