Advertisement

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात युतीच्या मानापमानाचा अंक


मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात युतीच्या मानापमानाचा अंक
SHARES

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाच्या नूतनीकरणावरून शिवसेना आणि भाजपात सध्या मानापमानाचे नाट्य रंगले आहे. त्यामुळे कालिदास नाट्यगृहाचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे.

तब्बल 24 कोटी रुपये खर्चून मुंबई महापालिकेने कालिदास नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून वर्ष उलटून गेले तरी हे काम सुरूच आहे. प्रियदर्शनी क्रीडा संकुलाची देखरेख करणारी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान ही शिवसेनाप्रणित संस्था या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप स्थानिक भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे. तसेच या क्रीडा संकुलात प्रचंड गैरव्यवहार असल्याने संकुलाचा ताबा पालिकेने घ्यावा, अशी मागणी केली आहे.

जूनपर्यंत या नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले नाही, पुढील 15 दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाट्यगृहचे उद्घाटन करू, असा इशारा गंगाधरे यांनी दिला अाहे.

तर गंगाधरे यांचे सर्व आरोप धुडकावून लावत नाट्यगृह सुरू होण्यास अजून 1 ते 2 महिने लागतील, अशी प्रतिक्रिया बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानचे विश्वस्त आदेश बांदेकर यांनी दिली.

मुंबईतील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक सोईसुविधांनी सज्ज अशा नाट्यगृहाची आतुरता सर्वच नाट्यप्रेमींना आहे. त्यामुळे हे नाट्यगृह लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा प्रसिद्ध दिगदर्शक, निर्माते केदार शिंदे यांनी व्यक्त केली.

याआधी कालिदास नाट्यगृह वातानुकूलित करण्याच्या कामासाठी सहा महिने बंद होते. आता पुन्हा वर्षभर हे नाट्यगृह बंद राहील. त्यामुळे महापालिकेचा मोठा महसूल बुडणार आहे. शिवाय पूर्व उपनगरातील नाट्यरसिकांना दर्जेदार नाटक पाहण्यासाठी ठाणे किंवा मुंबई गाठावी लागली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा