Advertisement

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी १०० विशेष एसटी बस

प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करण्यात येणार आहे

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी १०० विशेष एसटी बस
SHARES

होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं नेहमीच्या बसेसव्यतिरिक्त १०० जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस १६ ते २७ मार्च २०२२ या कालावधीत कोकण मार्गावर धावतील.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष एड. अनिल परब यांनी ही माहिती दिली.

होळीसाठी मोठ्या संख्येनं लोक आपापल्या गावी जातात. काही ठिकाणी एसटी महामंडळाचा संप अजूनही सुरूच आहे, अशा स्थितीत खासगी बसेस प्रवाशांकडून जास्त भाडे आकारत आहेत, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी परिवहन आयुक्तांना तक्रारीची तातडीनं दखल घेऊन तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

गणेशोत्सवासोबतच कोकणात होळीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवासाठी मुंबईतील लाखो लोक कोकणातील आपापल्या गावी जातात. त्यामुळे या उत्सवात प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते.

या जादा बसेस मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा आणि पनवेल आगारातून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडीसाठी चालवण्यात येणार आहेत.

जादा बसेस सोडण्यासाठी परिवहन विभागाची पूर्ण तयारी असून पुणे, सातारा, सांगली आदी भागातून जादा बसेस मागवण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा