Advertisement

तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील ११ गाड्या रद्द


तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील ११ गाड्या रद्द
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू आणि वाणगाव स्टेशनदरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ७ गाड्या, तर गुजरातकडे जाणाऱ्या ४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

वाणगाव आणि डहाणू रोड रेल्वे स्टेशनदरम्यान मालगाडीच्या दोन डब्यांना लागलेल्या आगीमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक डहाणू स्थानकापर्यंतच सुरू आहे. तर डहाणू- विरार, बोरिवली लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.


या गाड्या रद्द 

अहमदाबाद पॅसेंजर

डहाणू - अंधेरी मेमू शटल

वलसाड पॅसेंजर

सुरत - विरार शटल

डहाणू - पनवेल मेमू

बोईसर - दिवा मेमू

फ्लाइंग राणी

विरार - डहाणू मेमू

वलसाड पॅसेंजर

फ्लाईंग राणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा