पश्चिम रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक

 Mumbai
पश्चिम रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक
Mumbai  -  

हार्बरच्या विस्तारीकरणासाठी मुंबई रेल्वे विकास महांमडळ (एमआरव्हीसी) कॉर्पोरेशनकडून जोगेश्वरी स्थानकाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 12 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम 22 एप्रिलला शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत चालणार आहे. या कामामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने रविवार दुपारपर्यंत लोकल प्रवास करू नये, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

अंधेरी आणि गोरेगावमध्ये डाऊन स्लो मार्गावरील लोकल डाऊन फास्ट मार्गावर चालविण्यात येणार आहेत. राम मंदिर स्थानकावरही लोकलला थांबा नसला तरीही जोगेश्वरी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर थांबा देण्यात येणार आहे. तसेच 23 एप्रिल ते 7 मेपर्यंत सर्व जलद 12 डबा लोकल गाड्यांना जोगेश्वरी स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात येईल.

Loading Comments