Advertisement

एसटीच्या ताफ्यात १,३०० नवीन गाड्या दाखल होणार

एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षभरात १,३०० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात १,३०० नवीन गाड्या दाखल होणार
SHARES

एसटी महामंडळाच्या ताफ्यात वर्षभरात १,३०० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. एसटी महामंडळानं राज्य शासनाकडं यासंदर्भात प्रस्ताव सादर केला असून, राज्याच्या अर्थसंकल्पातही त्याची तरतूद केली जाणार आहे. परंतु, महामंडळाला २ हजारांपेक्षा जास्त बसगाड्यांची गरज असतानाही तुलनेनं कमी बस  दाखल होणार आहेत.

राज्याच्या २०२०च्या अर्थसंकल्पात १,५०० पर्यंत बसची तरतूद करण्यात आली होती. परंतु मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊन व शासन आणि एसटी महामंडळाचीही आर्थिक स्थिती बिकट झाल्यानं बस ताफ्यात येऊ शकल्या नाहीत. पुन्हा मागचाच प्रस्ताव सुधारित करताना त्यात १,३०० बसच एसटीला मिळतील. साधारण २ ते ३ वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बस होत्या. बसची कालमर्यादा संपल्यानं दरवर्षी भंगारात जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक असते. 

त्यानुसार, नवीन बसची खरेदी होते. परंतु कोरोना काळात ती फारशी होऊ न शकल्यानं एसटीच्या ताफ्यातील संख्या १५,८०० पर्यंत पोहोचली. जानेवारी २०२० पर्यंत फक्त ७०० पर्यंत नवीन एसटी बस दाखल झाल्या होत्या. सध्या एसटीची प्रवासी संख्या २३ ते २४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाकाळाआधी दररोज ६० ते ६५ लाख प्रवासी प्रवास करत होते.

  • एसटीची प्रवासी संख्या – २३ ते २४ लाख
  • बसगाड्या – १५,८०० पैकी १४ हजार बस धावतात
  • उत्पन्न – दररोज १२ कोटी ५० लाख रुपये
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा