Advertisement

ख्रिसमससाठी सीएसटीएम ते करमाळी १६ विशेष गाड्या


ख्रिसमससाठी सीएसटीएम ते करमाळी १६ विशेष गाड्या
SHARES

ख्रिसमस आणि नववर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात जाऊन करणार असाल, तर तुमच्यासाठी एक खूषखबर आहे. कारण याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं सीएसटीएम ते करमाळीसाठी १६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून म्हणजेच २१ ते १ जानेवारीपर्यंत या विशेष गाड्या चालवण्यात येतील.


सीएसटीएम ते करमाळी धावणार गाड्या

सीएसटीएम ते करमाळी या स्थानकांदरम्यान या गाड्या धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्व गाड्या १४ डब्यांच्या असून एसी टू टायरचा एक कोच, एसी थ्री टायरचे ५ कोच, सेकण्ड स्लीपर क्लासचे ६ कोच, २ जनरल कोच असतील. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आनंदी आणि सुखकर होईल, यात काही शंका नाही.


अशा प्रकारे असणार थांबा

दादर ते थिवीम असा या गाड्यांना थांबा असणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर या गाड्या थांबणार आहेत.


गाड्यांचं वेळापत्रक खालीलप्रमाणे 

  • (०२०२५) सीएसटीएम ते करमाळी ही गाडी २१ आणि २८ डिसेंबरला पहाटे ५ वाजता सुटणार असून ती दुपारी १ वाजून २० मिनिटांनी करमाळीला पोहोचेल.
  • परतीच्या प्रवासासाठी करमाळी ते सीएसटीएम २१ आणि २८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून रात्री ११ वाजता सीएसटीएमला येईल.
  • (०२०२७) सीएसटीएम ते करमाळी ही गाडी २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी सकाळी ११ वाजता पोहचेल.
  • परतीच्या प्रवासासाठी २३, २४, ३० आणि ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सुटणार असून त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सीएसटीएम येथे पोहचेल.
  • (०२०२९) सीएसटीएम ते करमाळी विशेष गाडी २५ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी करमाळीला पोहचेल.
  • परतीच्या प्रवासासाठी करमाळी ते सीएसटीएम २५ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता सुटून रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसटीएमला येईल.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा