Advertisement

प्रवाशांच्या सोयीसाठी मेगाब्लॉकदरम्यान २५ विशेष बस

मध्य रेल्वे प्रशासनाकडून २१ व २२ नोव्हेंबरला २ दिवस सकाळी १०.१५ ते २.१५ या कालावधीत प्रत्येकी ४ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी मेगाब्लॉकदरम्यान २५ विशेष बस
SHARES

मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या नवीन पत्रीपुलासाठी रेल्वेरुळांवर गर्डर उभारण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून २१ व २२ नोव्हेंबरला २ दिवस सकाळी १०.१५ ते २.१५ या कालावधीत प्रत्येकी ४ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे.

मेगाब्लॉक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या कालावधीत केडीएमटीच्या विशेष २५ बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार दर १० मिनिटाला या बस सोडल्या जाणार असल्याची माहिती मिळते. डोंबिवली-ठाणे तसंच कल्याण-कसारा आणि कर्जत अशी रेल्वे वाहतूक मेगाब्लॉकदरम्यान चालू राहणार आहे. परंतु, कल्याण-डोंबिवली रेल्वेमार्ग बंद राहणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केडीएमटीकडून २५ बस सोडण्यात येणार आहेत.

कल्याण-डोंबिवलीसाठी १० बस, डोंबिवली पूर्व ते विठ्ठलवाडी, कल्याण-बदलापूर आणि कल्याण-टिटवाळा अशा प्रत्येकी ५ बस सोडण्याचं नियोजन २१ व २२ नोव्हेंबरला दोन्ही दिवशी करण्यात आल्याची माहिती मिळते. जुन्या पत्रीपुलाच्या ठिकाणी गर्डरचं काम सुरू राहणार आहे. परंतु, सध्या वापर सुरू असलेल्या पुलावरून सार्वजनिक उपक्रमांच्या बसना प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु, पुलावर वाहनांची गर्दी वाढल्यास कल्याण पश्चिमेतील सुभाष चौक येथील बाईचा पुतळा, श्रीराम टॉकिज, पुणे लिंक रोड ते बाजीप्रभू चौक अशी बस चालविली जाणार आहे.

एसटीही धावणार

एसटी महामंडळाच्या बसही धावणार आहेत. डोंबिवली ते ठाणे पुढे मंत्रालय, कल्याण ते मंत्रालय अशा बस चालविणार आहेत. तसेच ठाणे येथूनही कल्याणच्या दिशेने बस चालविण्याचे नियोजन करण्यात आले. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा