Advertisement

पुढील 18 महिन्यांत मुंबईहून आणखी 4 रो-रो सेवा सुरू होणार

प्रकल्प बोलीच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि सागरमाला योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या समान निधीतून त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

पुढील 18 महिन्यांत मुंबईहून आणखी 4 रो-रो सेवा सुरू होणार
SHARES

मुंबई ते मांडवा दरम्यान रो-रो (Ro-Ro) सेवेच्या यशानंतर, पुढील 18 महिन्यांत आणखी चार सेवा मोरा, काशीद, दिघी आणि रेवस येथे सुरू होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

प्रकल्प बोलीच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि सागरमाला योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या समान निधीतून त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

महाराष्ट्र (Maharashtra) मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी म्हणाले, “सप्टेंबर 2020 मध्ये मुंबई-मांडवा रो-रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेक ऑपरेटर अशा सेवांसाठी पुढे आले.”

या चार प्रकल्पांच्या निविदा वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत "आम्ही येत्या दीड वर्षात त्यापैकी किमान तीन सुरू होण्याची अपेक्षा करतो", ते म्हणाले. "मुंबई ते मोरा, काशीद आणि दिघी या तीन सेवांचा एकत्रित खर्च सुमारे 200 कोटी रुपये आहे."

गुजरातच्या लोथल येथील नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये सुमारे 2,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनसाठी राज्य सरकारने केंद्राला विनंती केली.

“शिवाजी महाराजांच्या काळात वापरल्या गेलेल्या युद्धनौकांच्या ताफ्याशी संबंधित चित्रे या मंडपात प्रदर्शित होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बंकर इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबतही राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. बंकर इंधनावरील व्हॅट कमी करण्याची मागणी प्रवासी बोट सेवा चालकांनी केली आहे. प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

“ही प्राथमिक चर्चा होती आणि नौका मालकांना जहाजांच्या अपग्रेडेशनसाठी प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारकडून मागणी केली जाईल. बंकर इंधनावरील व्हॅटमध्ये कपात केल्याने या जलमार्गांच्या सेवांचा खर्च कमी होण्यास मदत होईल, असे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

ठाणे ते डोंबिवलीचा प्रवास होणार फक्त 20 मिनिटांत

इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस दोन दिवस हेरिटेज टूरसाठी धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा