मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Electronic AC Double Decker Bus) पहिल्याच दिवशी (Mumbai News) एक हजारांपेक्षा जास्त मुंबईकरांनी या डबलडेकर बसमधून प्रवास केला आहे.
हेरिटेज टूरसाठी 'ही' बस धावणार
ए-115 क्रमांकाची ही बस सोमवार ते शुक्रवारमध्ये दररोज सीएसएमटी ते नरिमन पॉईंटपर्यंत अर्धा तासांच्या अंतराने धावणार आहे. तर शनिवार तसंच रविवारी हेरिटेज टूर (heritage tour) म्हणून सेवा देणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ही बस सेवा असेल. तेव्हा हेरिटेज टूरलाही मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईत चांगलाच उकाडा वाढला आहे. त्यातच बेस्ट ताफ्यात एसीबस दाखल झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत डबल डेकरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना गारेगार प्रवास करता येत आहे.
किती वाजता सुटते?
सीएसएमटीहून सकाळी पावणे नऊला पहिली बस सुटली. प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. एकूण 200 बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत.
सध्या ही बस सीएसएमटी स्टेशन (CSMT Station) ते एनसीपीए (NCPA) या मार्गावर चालवली जाणार आहे. सकाळी 8.45 ते रात्री 10.30 या वेळेत ही बस धावणार आहे. या बससाठी मार्ग नंबर 115 असणार आहे. या एसी डबलडेकर बसचे (AC Double Decker Bus) भाडे देखील सामान्यांच्या आवाक्यातील आहे.
सर्वसामान्यांना परवडेल 'असे' तिकिट दर
पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात 7 वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस आहेत. एकूण 65 आसनव्यवस्था असलेली ही डबल डेकर बस आहे. सध्या दोनच बस मुंबईकरांच्या सेवेत येणार असून पुढच्या आठवड्यापर्यंत आणखी 7 ते 8 बस सेवेत येतील.
तसंच मार्चअखेर 200 एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ होतील. या बसचं तिकिट सर्वसामान्यांना परवडेल असं आहे. या वातानुकुलित बसचं कमीतकमी तिकिट 6 रुपये आहे. स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून देखील तिकीट काढता येणार आहे.
हेही वाचा