Advertisement

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस गाडीच्या वेळेत होणार बदल!

प्रवाशांच्या या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय.

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस गाडीच्या वेळेत होणार बदल!
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या वंदे भारत ट्रेनच्या वेळेबाबत रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.

प्रवाशांकडून वेळ बदलण्याची मागणी

सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी दुपारी 12 वाजता वंदे भारत गाडी पोहचते. त्यानंतर दुपारी चार वाजता ती पुन्हा सोलापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटते. सोलापूरहून मुंबईला कामानिमित्त गेलेल्या प्रवाशांना 12 ते 4 हा खूप कमी कालावधी मुंबईत मिळतो. त्यामुळे ही गाडी उशीरा सोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आलीय. प्रवाशांच्या या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय.

गाडीच्या वेळात होणार बदल!

'रेल्वेचे जनरल मॅनेजर मागच्या आठवड्यात सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळी आम्ही प्रवाशांच्या मागण्या त्यांच्या कानावर घातल्या आहेत. त्याप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते सोलापूर गाडीच्या वेळेत बदल होऊ शकतो. त्याचप्रमाणे ऑटोमॅटिक डोअरमध्ये थोडे बदल करण्यात आले असून त्याबाबतची अडचण येत्या काळात दूर होईल,' अशी माहिती सोलापूर रेल मंडलचे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी दिली आहे.

संध्याकाळी पाच नंतर उपनगरीय गाड्यांची संख्या वाढते. या गोष्टीचाही विचार वेळ बदलताना केला जाईल, असं त्यंनी स्पष्ट केलं.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

मुंबई आणि सोलापूर या प्रवासातील वेळेची बचत करणाऱ्या या रेल्वेला पहिल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सोलापूर ते मुंबई या ट्रेनसाठी साध्या आणि एअर कंडिशन या वर्गाची आसनक्षमता ही अनुक्रमे 1024 आणि 104 इतकी आहे. 11 ते 19 फेब्रुवारी या कालावधीच्या दरम्यान पहिल्या आठवड्यानंतर साध्या वर्गातील प्रवाशांकडून 52 लाख 7 हजार 778 तर एसी कोचनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 10 ला्ख 61 हजार 654 रुपयांची कमाई झाली आहे.



हेही वाचा

मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळेत बदल, पहा नवीन टाईमटेबल

ठाणे ते डोंबिवलीचा प्रवास होणार फक्त 20 मिनिटांत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा