Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांचे आज आणि उद्या पगार होणार


बेस्ट कर्मचाऱ्यांचे आज आणि उद्या पगार होणार
SHARES

मुंबई - महापालिकेची बेस्ट आर्थिक तोट्यात चालत आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर बेस्ट कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगाराचा तिढा सुटला आहे. सुमारे 42 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्याचा पगार आज आण उद्या देण्यात येणार आहे.

त्यासाठी 185 कोटी रुपयांची आवश्यकता लागणार आहे. तसेच बेस्ट उपक्रम कर्मचाऱ्यांच्या पगाराची कायम स्वरूपात व्यवस्था केली जाणार आहे. यापुढे पगाराचा प्रश्न उद्भभवू नये आणि बेस्टला कायमस्वरुपी आथिर्क संकटातून बाहेर काढण्यासाठी या आठवडाभरातच बेस्ट, पालिका मिळून एक कृती आराखडा तयार करून तोडगा काढला जाणार आहे.

शनिवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात शिवसेनेचे पालिकेतील नेते यांची महत्त्व पूर्ण बैठक झाली. 185 कोटींची रक्कम देऊन आज 31 हजार कर्मचाऱ्यांना आणि उद्या 11 हजार कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार आहे. तूर्तास हा खर्च स्वतः बेस्ट भागवणार आहे. बेस्ट गेली अनेक वर्षे मोठ्या तोट्यात आहे . परिणामी आता बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी ही बेस्टकडे पैसे नाहीत, बेस्टने दोन बँकांकडे 160 कोटींचे कर्ज मागितले आहे. हे कर्ज मिळाल्यानंतर आज आणि उद्या बेस्ट कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचा थकित पगार देण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा