Advertisement

५७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ही टार्गेट केलं आहे.

५७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
SHARES

कोरोनानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ही टार्गेट केलं आहे. कोरोनामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय, आतापर्यंत ५७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. १७ सप्टेंबपर्यंत हीच संख्या ४३ होती. तर एकूण कोरोनाबाधित कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या १,७२१ पर्यंत पोहोचली आहे.

मागील १२ दिवसांत १४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये ठाणे विभागातील सर्वाधिक ८ कर्मचारी असून जळगाव विभागातील ६, सांगली व कोल्हापूर विभागातील प्रत्येकी पाच, नागपूर विभागातील ४, मुंबई विभागातील एक आहे. कर्तव्यावर असताना चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक, सुरक्षारक्षक यांचा मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखांची आर्थिक मदत दिली जाते.

मात्र मृतांच्या कुटुंबीयांपैकी केवळ ५ जण आतापर्यंत या मदतीकरिता पात्र ठरले आहेत. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी शासनाच्या नियमानुसारच आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा