Advertisement

उन्हाळी सुट्ट्यांसाठी 'या' मार्गावर ६ स्पेशल ट्रेन्स


उन्हाळी सुट्ट्यांसाठी 'या' मार्गावर ६ स्पेशल ट्रेन्स
SHARES

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणार असाल तर त्यांच्यासाठी एक खूषखबर आहे. कारण मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई आणि करमाळीदरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळी सुट्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने तुडुंब भरून जातात. त्यामुळे या मार्गावर ६ विशेष गाड्या चालवण्यात येतील. सीएसएमटी ते करमाळीदरम्यान दोन फेऱ्या, पनवेल ते करमाळी दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ४ फेऱ्या अशा एकूण सहा फेऱ्या चालवल्या जातील.


गाड्यांचं वेळापत्रक

सीएसएमटी ते करमाळी या दरम्यान १ आणि २ मे च्या मध्यरात्री १.३० वा. सुटेल आणि करमाळीला स. ११.३० वाजता पोहचेल. करमाळी येथून ही गाडी ४ मे ला स. १०.२० वा. सुटेल आणि रात्री ११.१५ वा. सीएसएमटीला पोहचेल.


थांबा

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या गाड्यांना १५ स्लीपर क्लास आणि २ जनरल सेकंड क्लासचे डब्बे जोडण्यात आले आहेत.


पनवेल-करमाळी वेळापत्रक

पनवेल ते करमाळी ही गाडी पनवेल येथून २ मे व ३ मे च्या मध्यरात्री ११.४० ला सुटेल आणि करमाळीला सकाळी ९ वाजता पोहचेल. करमाळी येथून २ मे आणि ३ मे रोजी दुपारी २ वाजता गाडी सुटेल आणि पनवेलला रात्री १०.४० वाजता पोहचेल. या सर्व गाड्यांचं आरक्षण १ मे पासून उपलब्ध होईल.


थांबा

रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या गाड्यांना १५ स्लीपर क्लास आणि २ जनरल सेकंड क्लासचे डब्बे जोडण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा