Advertisement

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रुळांजवळील 'इतक्या' अतिक्रमणांवर हातोडा

जूनपासून लोकल सेवा हळूहळू पूर्ववत झाल्यानंतरही रूळ ओलांडताना रेल्वेगाड्यांच्या धडकेत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रुळांजवळील 'इतक्या' अतिक्रमणांवर हातोडा
SHARES

दिवसेंदिवस रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. लोकलच्या (Mumbai Local) तुलनेत प्रवासीसंख्या अधिक आहे. त्यामुळं अनेकांना (Passenger) दररोज रेल्वे अपघाताला सामोरं जावं लागतं. त्यामुळं, रेल्वे अपघात कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) हाती घेतलेल्या ‘मिशन शून्य अपघात’ मोहिमेंतर्गत रूळ ओलांडण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी या वर्षांत रुळांजवळील ९७८ अतिक्रमणे पाडण्यात आली, तर रूळ ओलांडणाऱ्या ४,४७२ जणांची धरपकडही करण्यात आली आहे.

रूळ ओलांडून पलीकडच्या फलाटावरून जाणे, जवळचा रस्ता म्हणून रूळ ओलांडणे हे प्रकार अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. रूळ ओलांडताना लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसची धडक बसून प्रवासी गंभीर जखमी होतात. प्रसंगी जीवही गमावतात. त्यामुळे स्थानकातील किंवा जवळील पादचारी पुलांचा वापर करण्याचे आवाहन रेल्वेकडून वारंवार केले जाते. याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्याने मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर जानेवारी ते सप्टेंबर २०२० पर्यंत लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसची धडक लागून ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९३ जण जखमी झाले आहेत.

यापैकी पश्चिम रेल्वेवर १७२ जण ठार झाले आहेत. जूनपासून लोकल सेवा हळूहळू पूर्ववत झाल्यानंतरही रूळ ओलांडताना रेल्वेगाड्यांच्या धडकेत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हे अपघात रोखण्यात रेल्वे प्रशासन अद्यापही यशस्वी झालेले नाही. मात्र पश्चिम रेल्वेने रूळ ओलांडण्याच्या प्रकारांना आळा घालत असल्याचा दावा केला आहे.

रुळांजवळील अतिक्रमणांमुळेही रूळ ओलांडण्याचे प्रकार घडतात. अतिक्रमणात राहणारे शॉर्टकटचा पर्याय निवडतात. त्यासाठी संरक्षक भिंतही तोडतात. म्हणून रेल्वेने २०१९ मध्ये ६०० अतिक्रमणे पाडली, तर २०२०मध्ये ९७८ अतिक्रमणे पाडली.



हेही वाचा -

प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा