Advertisement

एसी लोकलची चाचणी आता 'परे'वर


एसी लोकलची चाचणी आता 'परे'वर
SHARES

'परे'च्या प्रवाशांना आता गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. त्याचे कारण आहे पश्चिम रेल्वेवर धावणारी एसी लोकल. 'परे'वर एसी लोकल चालवण्यास रेल्वे प्रशासनाने प्रतिसाद दिला असून, आता रेल्वे बोर्डानेही या गाडीच्या चाचण्या पश्चिम रेल्वेवर घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे 'मरे'नंतर आता 'परे'वर देखील एसी लोकलची चाचणी घेतली जाणार आहे. वर्षभरापूर्वी कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एसी लोकलची पहिली चाचणी गेल्या महिन्यामध्ये 'मरे'च्या ठाणे ते कल्याण स्टेशनदरम्यान करण्यात आली होती. मध्य रेल्वेने ही चाचणी केल्यानंतर नकारात्मक भूमिका घेतली होती.

तब्बल 54 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या वातानुकूलित लोकलच्या चाचण्या सध्या मध्य रेल्वेवर सुरू आहेत. या चाचण्या सुरू होण्याआधीच मध्य रेल्वेने ही गाडी फक्त कुर्ला ते कल्याण या दरम्यान चालवण्याची तयारी दर्शवली आहे. पश्चिम रेल्वेने मात्र ही गाडी चर्चगेट ते विरार या दरम्यान चालवण्याची भूमिका घेतली होती. तसेच ही गाडी पश्चिम रेल्वेवर चालवण्याची परवानगीही रेल्वे बोर्डाकडे मागितली होती. पश्चिम रेल्वेवरील अनेक स्थानकांच्या फलाटांची उंची जास्त असल्याने एसी लोकल चालवण्यास अडथळा निर्माण होत होता. मात्र 'परे'च्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून प्लॅटफॉर्मवरील उंची कमी करण्यासाठी काम चालू करण्याची इच्छा दर्शवली आहे. विशेष म्हणजे आता 'मरे'वर या गाडीच्या 80 टक्के चाचण्या पूर्ण झाल्या असून, सर्वच चाचण्या यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मध्ये रेल्वेवरील उर्वरित चाचण्यांसाठी एक आठवडा ते दहा दिवस लागणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा