Advertisement

प्रवाशांना मिळणार लोकलमधील तांत्रिक बिघाडाची अचूक माहिती

मोटरमन, गार्डच्या केबिनमध्ये 'मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन' यंत्रणा बसवण्यात आली असून, ही यंत्रणा रेल्वे नियंत्रण कक्षासह प्रत्येक महत्त्वाच्या विभागाशी जोडण्यात आली आहे.

प्रवाशांना मिळणार लोकलमधील तांत्रिक बिघाडाची अचूक माहिती
SHARES

लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहेत. काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना लोकलच्या वेळापत्रकाबाबत अचूक माहिती मिळावी यासाठी काही उपाययोजना सुचविल्या होत्या. तसंच, त्या योजनांवर काम केलं जात असून, आता त्याला आता यश आलं आहे. मोटरमन, गार्डच्या केबिनमध्ये 'मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन' यंत्रणा बसवण्यात आली असून, ही यंत्रणा रेल्वे नियंत्रण कक्षासह प्रत्येक महत्त्वाच्या विभागाशी जोडण्यात आली आहे.

या विभागांशी संपर्क साधून माहिती घेणे मोटरमन व गार्डना शक्य होणार आहे. या यंत्रणेचं उद्घाटन सोमवारी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांच्या हस्ते करण्यात आले. पावसाळ्यात रुळावर पाणी साचल्यास किंवा एखादा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते. अशावेळी लोकल एकाच जागी खोळंबून राहतात आणि लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना नेमक्या कोणत्या कारणामुळं खोळंबा झाला हे कळतच नाही. परिणामी, प्रवासी धोका पत्करून लोकलमधून उतरून रुळावरून चालत पुढील स्थानक गाठतात. असे प्रकार स्थिती वर्षांनुवर्षे घडतच आहेत.

लोकल चालवताना मोबाइलवर बोलण्यास मोटरमनला मनाई आहे. त्यामुळं एखादी दुर्घटना घडल्यास फक्त गार्डकडून याची कल्पना प्रथम जवळच्या स्थानकातील स्टेशन मास्तर, रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली जाते. त्यामुळं लोकल का थांबली याचं कारण तात्काळ गार्डकडे व्हॉकीटॉकीद्वारे संपर्क साधून विचारले जाते, तर रेल्वे व्यवस्थापन कक्षात असलेल्या मोठ्या स्क्रीनवर लोकलची सद्यस्थिती समजते. परंतु सक्षम अशी यंत्रणा नसल्याने मोठे अडथळे येतात. त्यामुळेच मोटरमन, गार्ड व नियंत्रण व व्यवस्थापन कक्षात सुसंवाद राहावा आणि अचूक माहिती मिळावी. तसेच प्रवाशांनाही त्याद्वारे वेळेत माहिती पोहोचावी म्हणून मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन सिस्टिम बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

गार्ड आणि मोटरमनच्या केबिनमध्ये ही यंत्रणा कार्यरत राहणार असून, ती नियंत्रण कक्षाशी जोडलेली असेल. एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास मोटरमनदेखील गार्डबरोबर लोकलच्या विभाग नियंत्रकाशी संपर्क साधू शकतो. शिवाय नियंत्रण कक्ष, रेल्वे पोलिसांशीही संपर्क साधता येईल. एखाद्या घटनेच्या माहितीची देवाणघेवाण केल्यावर प्रवाशांनाही अवघ्या काही मिनिटांत अचूक माहिती मोटरमन, गार्डकडून उद्घोषणेमार्फत देण्यात येईल.

Read this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा