Advertisement

Coronavirus: अतिरिक्त भाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर होणार कारवाई - अनिल परब

खाजगी बसेसकडून प्रवाशांची लूटमार होते. त्यामुळे ही लूटमार थांबवण्यासाठी व अधिकचे प्रवास भाडे घेण्यात आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले.

Coronavirus: अतिरिक्त भाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर होणार कारवाई - अनिल परब
SHARES

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय व खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी जेथे अधिक बसेस सोडण्याची आवश्यकता आहे तेथे त्यानुसार त्वरित कार्यवाही करुन प्रवाशांची संभाव्य गैरसोय दुर करण्याच्या सूचना एसटी महामंडळाला देण्यात आल्या आहेत. परंतु, अनेकदा अशा संधीचा फायदा घेऊन खाजगी बसेसकडून प्रवाशांची लूटमार होते. त्यामुळे ही लूटमार थांबवण्यासाठी व अधिकचे प्रवास भाडे घेण्यात आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले. 

याप्रकरणी 'अत्यावश्यक सेवा वगळता खबरदारीची उपाययोजना म्हणून काही  खाजगी कंपन्यानी घरून काम करण्याची परवानगी  दिली आहे. तसंच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी,प्रवाशी  गावी जात आहेत. 

या काळात खाजगी बस सेवांनी अधिक चे प्रवास भाडे घेतल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खाजगी बससेवांनी सामाजिक बांधीलकीतुन योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यक उपाययोजना करून सहकार्य करावे असंही अनिल परब यांनी म्हटलं.

एसटी प्रशासनाकडून खबरदारी

  • राज्यातील प्रमुख शहरातील गर्दीच्या बसस्थानकावरील बैठक व्यवस्था दररोज दिवसातून २-३ वेळा सॅनिटायझरचा योग्य वापर करून स्वच्छ केली जावी. 
  • बस स्थानकाचा परिसर जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक केला जावा. 
  • वाहकाकडे कर्तव्यावर निघत असताना सँनिटरी लिक्विड एक बाटली देण्यात यावी. 
  • प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांनी ती उपलब्ध करावी. 
  • आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बसे सॅनिटरी लिक्विड मिश्रित पाण्याने स्वच्छ धुऊनच मार्गस्थ केली जावी.
  • बसस्थानकावरील उद्घघोषणा यंत्रणेद्वारे वेळोवेळी करोना विषाणूंच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रवाशांना आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहेत.  
  • प्रवाशांनीही काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये असेही आवाहन केले जात आहे.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा