Advertisement

वंदे भारत एक्सप्रेस नंतर देशात वंदे मेट्रो डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होणार

यानंतर 2024-25 मध्ये या गाड्यांचे उत्पादन वाढवले जाणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस नंतर देशात वंदे मेट्रो डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होणार
SHARES

वंदे भारत एक्सप्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून लवकरच वंदे मेट्रो सुरू होणार आहेत.

वंदे भारत एक्सप्रेसच्या धरतीवर सुरू होणारी ही वंदे मेट्रो 100 किमीच्या आत वसलेल्या दोन शहरांना कनेक्ट करण्याचे काम करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही वंदे मेट्रो गाडी 2023 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यानंतर 2024-25 मध्ये या गाड्यांचे उत्पादन वाढवले जाणार आहे.

या वंदे भारत मेट्रो कामानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या लोकांना तसेच विद्यार्थ्यांना अधिक उपयुक्त राहणार आहेत. या ट्रेन जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव प्रवाशांना देण्यास सक्षम राहतील असा दावा रेल्वेच्या माध्यमातून केला जात आहे. ही ट्रेन रेल्वेच्या ताब्यात आल्यानंतर लोकल ट्रेन वरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. 

कशी असेल वंदे मेट्रो?

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी या ट्रेन बाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन 100 किलोमीटरच्या आत वसलेल्या शहरांदरम्यान सुरू केली जाणार आहे. ही ट्रेन एका दिवसात चार ते पाच फेऱ्या मारणार आहे. विशेष म्हणजे वंदे मेट्रोचा स्पीड हा वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा अधिक राहू शकतो.

शिवाय या गाडीचे तिकीट दर हे इतर गाडींच्या तुलनेत कमी असतील असे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद आणि स्वस्तात प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

वंदे मेट्रोमध्ये आठ डबे राहणार आहेत. अर्थातच वंदे मेट्रो वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा लहान राहील. या ट्रेनचा सर्वाधिक लाभ दैनंदिन प्रवाशांना होणार आहे. दैनंदिन प्रवाशांना स्वस्तात आणि जलद गतीने या ट्रेनमुळे प्रवास करता येणार आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा