Advertisement

विमान प्रवास महागला

विमानाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता जास्त भाडे द्यावे लागणार आहे.

विमान प्रवास महागला
SHARES

विमानानं प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता जास्त भाडे द्यावं लागणार आहे. कारण तेल कंपन्यांनी एअर टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किंमती वाढवल्या आहेत. गेल्या ६ महिन्यांत त्याचे दर ३०% वाढले आहेत.

ताज्या प्रकरणात दिल्लीत एटीएफच्या किंमतीत गुरुवारी ३.६ टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे त्याची किंमत प्रति लिटर ६८ हजार २६२ रुपयांवर पोहोचली आहे. जानेवारीत त्याची किंमत ५० हजार ९७९ रुपये होती. त्यानंतर तेल कंपन्या सतत त्याचे दर वाढवत आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं सांगितलं की, गुरुवारी किंमती वाढवण्यात आल्या. ही कंपनी एटीएफची सर्वात मोठी पुरवठा करणारी कंपनी आहे.

जागतिक स्तरावर तेलांचे दर सतत वाढत आहेत. म्हणूनच तेल कंपन्यांनी येथे किंमती वाढवायला सुरुवात केली आहे. दिल्लीत त्याचे दर ६८ हजार २६२ रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकातामध्ये हे ३.२७% टक्क्यांनी वाढून ७२ हजार २९५ रुपये झाली आहे. तर मुंबईत ती ३.७७% वाढून ६६ हजार ४८३ रुपये झाली आहे.

आकडेवारीनुसार जेट इंधनाच्या किंमती आणखी वाढू शकतात. जानेवारीत फेब्रुवारीत प्रति किलोलीटर ५० हजार ९७९ ची किंमत घसरून ५३ हजार ७९५ रुपयांवर गेली होती. मार्चमध्ये मात्र ती पुन्हा वाढून ५९ हजार ४०० रुपयांवर गेली आणि एप्रिलमध्ये ती प्रति किलोलीटर ५८ हजार ३७४ रुपयांवर पोहोचली. मेमध्ये ती वाढून ६१ हजार ६९० रुपये झाली. तर जूनमध्ये ती ६४ हजार ११८ रुपयांवर पोहोचली होती.

दरम्यान, देशातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या मेमध्ये दररोज ४ हजार ५०० होती, जी जूनमध्ये वाढून ७ हजार ५०० झाली. खरेतर, आंतरराष्ट्रीय उड्डाणं अजूनही ३१ जुलैपर्यंत स्थगित आहेत.

दिल्ली विमानतळावर स्थानिक प्रवाश्यांविषयी बोलायचे झाले तर, मेमध्ये दररोज १८ हजार प्रवासी येत होते. जूनमध्ये ती वाढून ६२ हजारांच्या पुढे गेली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपासून हवाई प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. तर फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान यामध्ये तेजी दिसली होती.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा