Advertisement

ऐन दिवाळीत एअर इंडियाचे कर्मचारी संपावर


ऐन दिवाळीत एअर इंडियाचे कर्मचारी संपावर
SHARES

दिवाळीचा बोनस न मिळाल्यामुळे एअर इंडियाचे एकूण ४०० कर्मचारी संपावर गेले आहेत. बुधवारी रात्रीपासून कर्मचारी संपावर गेल्यामुळे विमानतळावरील प्रवाशांचा खोळंबा होत असून त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं आहे. ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विमानतळावर चेकईनसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शिवाय अनेक विमानांची उड्डाणं उशिरान होत आहेत.


प्रवाशांचे हाल

संपावर गेलेले सर्वजण ग्राऊंड स्टाफ आहेत. चेक इन, सामान विमानात ठेवणे, विमानाची साफसफाई, कार्गो यांची जबाबदारी या ग्राऊंड स्टाफकडे असते. मात्र दिवाळीचा बोनस न मिळाल्याने एकूण ४०० कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.


चेकइन काऊंटर्स बंद

संपामुळे मुंबई विमानतळावरील चेकइन काऊंटर्स बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र एअर इंडियाकडून देखील या संपाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा