Advertisement

विमान अवतरणार रेल्वे ट्रॅकवर! शताब्दीला अत्याधुनिक 'अनुभूती' कोच!

रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावी यासाठी 'अनुभूती' कोचची निर्मिती करण्यात आली आहे. अगदी एखाद्या विमानात शोभतील अशा सर्व सोयी-सुविधा या कोचमध्ये देण्यात आल्या आहेत. त्यामुळे थेट विमानच ट्रॅकवर अवतरणार की काय असाच प्रश्न प्रवाशांना पडल्यावाचून राहाणार नाही.

विमान अवतरणार रेल्वे ट्रॅकवर! शताब्दीला अत्याधुनिक 'अनुभूती' कोच!
SHARES

मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या लवाजम्यानंतर आता पश्चिम रेल्वेवर सुपर लक्झुरियस असा 'अनुभूती' कोच येणार आहे. आरामदायी आणि सर्व सोयी सुविधांनी सज्ज असा हा 'अनुभूती' कोच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत(आयसीएफ) तयार करण्यात आला आहे.



आरामदायी 'अनुभूती' कोच

रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावी यासाठी 'अनुभूती' कोचची निर्मिती करण्यात आली आहे. अगदी एखाद्या विमानात शोभतील अशा सर्व सोयी-सुविधा या कोचमध्ये देण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण ५६ सीट्स आहेत. आरामदायी खुर्ची, पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा, प्रत्येक आसनाच्या मागे ९ इंच एलसीडी स्क्रिन, पर्सनल मोबाईल चार्जिंग स्पॉट अशा प्रकारच्या सर्व सोयी सुविधा या कोचमध्ये आहेत. त्यामुळे थेट विमानच ट्रॅकवर अवतरणार की काय असाच प्रश्न प्रवाशांना पडल्यावाचून राहाणार नाही.

या कोचच्या मध्यभागी छताला दोन स्क्रीन लावण्यात आल्या असून यावर जीपीएस तंत्रज्ञानाने ट्रेनचं लोकेशन रिअल टाईमवर कळू शकणार आहे. त्यामुळे ट्रेनचे सुरुवातीचे स्टेशन, पुढच्या स्टेशनला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, प्रवासाचं अंतर हे सर्व बसल्या जागी दिसणार आहे. शिवाय, या कोचला अॅंटि ग्राफिटी रंग देण्यात आला आहे. अशा पद्धतीने रंगवण्यात आलेला 'अनुभूती' हा पहिलाच कोच आहे.



शताब्दीला जोडणार 'अनुभूती' कोच

लिंके हॉफमन बुश अर्थात एलएचबी या प्रकारात 'अनुभूती' कोचची निर्मिती करण्यात आली आहे. हा कोच शताब्दी एक्स्प्रेसच्या एसी फर्स्ट क्लास एक्झिक्युटिव्ह चेअरकार कोचला जोडण्यात आला आहे.



२.८४ कोटींना पडणार एक कोच!

या एका कोचसाठी रेल्वेला २.८४ कोटी मोजावे लागले आहेत. तसेच, पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेस बरोबरच राजधानी एक्स्प्रेसलाही हे कोच जोडण्याची योजना आहे. या कोचसाठी एसी चेअर आणि एक्झिक्युटिव्ह चेअर यांच्यापेक्षा २० ते २५ टक्के भाडे जास्त असण्याचीही शक्यता आहे. यावर्षी रेल्वे बजेटमध्येच या कोचची तरतूद करण्यात आली होती.



'अनुभूती'ची अशी असेल 'अनुभूती'

  • आरामदायी आसने, मोठी लेग स्पेस
  • वैयक्तिक हेड लॅम्प, स्नॅक्स टेबल
  • वैयक्तिक कॉल अटेंड बटण
  • प्रत्येक सीटसाठी ९ इंचांची एलसीडी स्क्रीन
  • जीपीएस आधारित रिअल टाईम अपडेट
  • सेंसरवर चालणारे पाण्याचे नळ
  • बायो टॉयलेट
  • अँटि ग्रॅफिटी पद्धतीचं रंगकाम



हेही वाचा

आता हायफाय तेजस धावणार 'मुंबई टू अहमदाबाद'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा